इंटरनेटच्या माध्यमातून, अधिक चांगल्या प्रकारे आणि कमी खर्चात विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील (प्रयोग शिकवले जाऊ शकतात) शिक्षण दिले जाऊ शकते या संकल्पनेवर ऑन लाईन लॅब्ज हा उपक्रम (?) आधारित आहे. तसेच, प्रयोगशाळा आणि उपकरणांचा आभाव असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही प्रयोगशाळेचा फायदा घेत येईल. यामुळे प्रयोगशाळांचा अभाव असणाऱ्या शाळेतील विद्यार्थी इतर सुसज्ज शाळेतील विद्यार्थ्यांशी बरोबरीची स्पर्धा करू शकतील. प्रयोगशाळांमध्ये नेहमीच विद्यार्थ्यांना प्रयोगांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पण ऑन लाईन लॅब्जच्या माध्यामतून सगळे प्रयोग कोणत्याही वेळी आणि कुठेही केले जाऊ शकतात.
ऑन लाईन लॅब्जची 'लर्निंग-ईनेबल्ड असेसमेंट'विविध पैलूंच्या मूल्यांकनांमध्ये मदत करते जसे, प्रयोगाची पद्धत आणि कुशल हाताळणी, संकल्पना आणि प्रयोगाचे आकलन व प्रयोगाच्या परिणामाची नोंद आणि निष्कर्षासंबंधित कौशल्य.
ऑन लाईन लॅब्जच्या निर्मिती मध्ये विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील अनेक जटील फंक्शन्सच्या प्रदर्शनासाठी गणितीय तंत्रांचा अभ्यास आणि उपयोग यांचा समावेश आहे. वास्तविक भासणाऱ्या विविध प्रयोगशाळा बनवण्यासाठी अद्यावत असे सिम्यूलेशन तंत्रज्ञान वापरलेलं आहे. सगळ्या प्रायोगिक पद्धती व्यास्थित समजून घेण्यासाठी सखोल अभ्यास आणि संशोधनही केले गेलेलं आहे. प्रयोगाच्या पद्धती आणि उपकरणे या बद्दलची इत्यंभूत माहिती विविध प्रयोगशाळांना भेटी देऊन तसेच प्रत्यक्षिकांना हजेरी लाऊन आत्मसात केली गेलेली आहे. वास्तववादी स्थितींच्या आधारावर चित्रमय प्रतीकांचे व्हिज्वलायजेशन आणि निर्मिती केली गेलेली आहे तसेच त्यांची संबंधित वास्तविक उपकरणांशी तुलनाही केली गेलेली आहे (?). विविध संलेखन (ऑथरिंग) साधनांचा उपयोग करून सिमुलेशन्सना इंटरऍक्टीव्ह बनवले गेले आहे. या प्रकारे वास्तविक प्रयोगशाळेच्या वातावरणाची पुनर्निर्मिती आणि सिमुलेशन केले गेले आहे.
ऑनलाईन लॅब्ज www.olabs.edu.in.येथे होस्ट केल्या गेलेल्या आहेत. या सगळ्या लॅब्ज शाळांसाठी रजिस्ट्रेशन केल्यास नि:शुल्क उपलब्ध आहेत.